Dnyaneshwarvlog.blog

Dnyaneshwar Vlog - प्रवासाची आणि आठवणींची सफर !

Ramling Temple Yermala History || श्री शेत्र रामलिंग देवस्थान येरमला मराठवाड्यातील एक पर्यटन व धार्मिक स्थळ

 प्रस्तावना: रामलिंग देवस्थान हे महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील जिल्ह्यात आहे. आणि येरमळा गावामध्ये आहे. जिल्हा धाराशिव. राज्य महाराष्ट्र .

श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. निसर्गप्रेमींसाठी ट्रेकिंग, वन्यजीव निरीक्षण आणि शांत वातावरणाचा अनुभव घेण्यास उत्सुक भाविक येत असतात.

येरमळा रामलिंग घाट अभयारण्य:

१) स्थापना: २३ मे १९९७

२) शेत्रफळ: सुमारे २२.८३ चौरस किलोमीटर.

३) वनस्पती: आबां, नीम, बेल, पलाश, साळई, बाभूळ, खैर, काटेरी झुडपे व कोरडवाहू जंगल इत्यादी.

वातावरण व निसर्ग: पावसाळ्यात येथे हजारो पर्यटक येत असतात.

मी एक छायाचित्र काढलेले असून आपण त्या प्रतिमेत पाहू शकता.


 रामलिंग मंदिराकडे जाताना पायऱ्यावर आपणास माकडे 🐒 पाहायला मिळतात.








मोर 🦚, माकडे 🐒 व पक्ष्यांचा सहवास रामलिंग मंदिर 🛕 परिसरात आपणास पाहायला मिळतो. 

महत्व: श्रावण महिना हा रामलिंग मंदिराचा सर्वात पर्यटक काळ मानला जातो. 

श्रीरामांनी बाणाने येथे झरा निर्माण केला. जटायूने रावणाशी येथे युद्ध केले आणि वीरगती प्राप्त केली.

रचना : श्री रामलिंग मंदिर 🛕 हे दरीत वसलेले असून सुमारे ६० पायऱ्या उतरावे लागतात. मंदिराच्या मुख्य दरवाजा समोर सभामंडप आहे.

तसेच गर्भ ग्रह आणि जटायूची वेगळी देवळे आहेत.






टिप्पण्या