Dnyaneshwarvlog.blog
Tuljapur Trust Mandir In Maharashtra/तुळजापूर प्रवास मार्गदर्शन आणि तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी विशेष माहिती Tuljabhavani Trust Mandir Tuljapur
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना: तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.येथे असलेले मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. तुळजापूर येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे भाविकांची गर्दी दिसून येते.
तुळजा भवानी देवीचा इतिहास:- तुळजाभवानी मंदिराचा इतिहास सुमारे १२ शतकापर्यंत मागे जातो. यादव वंशाच्या काळात या मंदिराची स्थापना झाली आहे असे म्हटले जाते.
धार्मिक महत्व : तुळजाई देवीला सुष्टीची जननी असे मानले जाते.ती शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले आहे.
शिवाजी महाराजांचा सबंध: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी देवीची आराधना केली होती. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांना देवीकडून तलवार प्राप्त झाली होती.
तुळजाभवानीचे स्वरूप:
१) देवीचे रूप : तुळजाभवानी देवीला अष्टभुजा रूपात दर्शविले जाते. तिच्या हातात शस्त्रे,त्रिशूल, शंक आणि कमळ 🪷 इत्यादी आहेत.
२) प्रतिमा: तुळजाभवानी मंदिरातील मूर्ती काळ्या दगडाची आहे. आणि ती अत्यंत आकर्षक व प्रभावी आहे.
३) शक्तिपीठ: तुळजाभवानी हे भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.
धार्मिक विधी आणि उत्सव:
१) नवरात्र उत्सव:- नवरात्र मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देवीची आरती, होम, पूजन आणि जागर यांचा भव्य सोहळा तुळजाभवानी मंदिरात पार पडतात.
२) आरती व पूजा: सकाळ 🌞 संध्याकाळ 🌆 देवीची आरती केली जाते. आरतीला हजारो भाविक उपस्थित असतात. भाविकांची देवीला नारळ 🥥 , फुले 🌼 अर्पण करत असतात.
तुळजापूरचे मंदिर 🛕 :
१ ) मंदिर रचना: मंदिरात गाभारा, सभामंडप , दीपमाळ आणि प्रवेशद्वार आहे.
२) तीर्थशेत्र: तुळजापूर मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
आधुनिक काळातील महत्व: तुळजाभवानीदेवीचे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेतच नाही तर आधुनिक समाजजीवनातही अत्यंत महत्त्वाचे आहे.
आजच्या काळात देवीची उपासना ही परंपरा, संस्कृती आणि पर्यटन यांचा संगम ठरली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स




टिप्पण्या