- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना:-दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतामध्ये वसलेले हे ठिकाण आहे. हे हिल स्टेशन पर्यटकांसाटी हे एक स्वर्गच मानव लागेल. हे ठिकाण पूर्णपणे गार हवेच ठिकाण आहे. गार हेवेचे ठिकाण असल्यामुळे पर्यटकांची उन्हाळ्यात फार गर्धी आसते. वातावरण हे गार आसल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात गाढ झोप लागते.
निलगिरी प्रवतरांग दक्षिण भारतातील तामिळनाडू,केरळ आणी कर्नाटक या राज्यमध्ये पसरलेले आहे.
ऊटी हे प्रवत रांगा समुद्रसपाटीपासून २,२४० मीटर उंचीवर वसलेले हे ठंड हवेचे ठिकाण आहे.
उन्याळ्यात तापमान हे १५ ते २५ अंश सेल्शियस दरम्यान राहते. त्यामुळे पर्यटकानां गारवा अनुभवायला मिळतो.
मुख्य आकर्षणे खलीलप्रमाणे: ऊटी हे निसर्गपेमी आणी छायाचित्रकरांसाठी एक खजिनाच आहे असे मानले जाते. इथे पर्यटक गार हवेचे ठिकाण आसल्यामुळे तेवढेच आकर्षक होतात.
रोज गार्डन हे ऊटीतील २०,००० पेक्षा जास्त प्रकारच्या 🌹 गुलाबांच्या जाती आहेत. ऊटीचा चहा हा जगप्रसिद्ध आहे असे सांगण्यात आले आहे. तेथे डोंगर,धबधबे आणी दऱ्या निलगिरी प्रवतातून आपणास पाहण्यास मिळतात.
बॉटनिकल गार्डन: १८४७ या साली बॉटनिकल गार्डन ची स्थापना करण्यात आली. त्या गार्डनमध्ये रंगबेरंगी फुले 🌼 💐 आणी शेकडो वर्षे जुने वृक्ष यामुळे ते प्रसिद्ध आहे.
येथे फ्रासिल ट्री नवाचे वृक्ष हे २० दशलक्ष वर्षे जुने आहे असे सांगण्यात येत आहेत. पण ते जुने आहे असे दिसते.
दरवर्षी मे महिन्यात इथे प्रसिद्ध फ्लॉवर शो (Flower Show) भरवला जातो.
डोड्डाबेट्टा शिखर निलगिरी पर्वतरांगांमधील हे सर्वात उंच शिखर (सुमारे २,६३७ मीटर उंचीवर) आहे.
इथून संपूर्ण उटी शहराचे आणि आजूबाजूच्या दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. छायाचित्रकारांसाठी (Photographers) हे स्वर्ग मानले जाते.निलगिरी माउंटेन रेल्वे (Toy Train): युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेली ही ‘टॉय ट्रेन’ उटीचा आत्मा मानली जाते. मेट्टुपलयम ते उटी असा हा रेल प्रवास दाट जंगले, बोगदे आणि पुलांवरून होत असताना प्रवाशांच्या अंगावर रोमांच उभा करतो.
उटीला कसे पोहोचायचे?
विमान मार्ग: उटीचे स्वतःचे विमानतळ नाही. सर्वात जवळचे विमानतळ कोइम्बतूर (Coimbatore) हे आहे, जे उटीपासून सुमारे ८८ किमी अंतरावर आहे. तिथून टॅक्सी किंवा बसने उटीला पोहोचता येते.
गरम कपडे सोबत ठेवा: उटीमध्ये वर्षभर रात्रीच्या वेळी किंवा सकाळी थंडी असते, त्यामुळे जॅकेट, स्वेटर किंवा शाल सोबत ठेवणे कधीही सोयीचे ठरेल.टॉय ट्रेनचे बुकिंग आधीच करा: निलगिरी टॉय ट्रेनचे तिकीट मिळणे कठीण असते, त्यामुळे प्रवासाच्या काही महिने आधीच ऑनलाईन बुकिंग करून ठेवा. पर्यावरणाचे रक्षण करा: प्लास्टिकचा वापर टाळा आणि उटीचे नैसर्गिक सौंदर्य स्वच्छ व सुंदर राखण्यास मदत करा.
थोडक्यात सांगायचे तर…जर तुम्हाला दगदगीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक हवा असेल आणि काही दिवस शांततेत, निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतील, तर उटीची प्रवास हा तुमच्यासाठी उत्तम अनुभव ठरेल!

टिप्पण्या