मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

संत ज्ञानेश्वर महाराज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचा संपूर्ण इतिहास,भक्ती महिमा आणि दर्शन मार्गदर्शक

प्रस्तावना :- भक्ती आणि ज्ञानाचे पावन तीर्थशेत्र महाराष्ट्राच्या मातीला संतांचा आणि थोर वारकरी परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. जेव्हा आपण भक्ती आणि ज्ञानाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती मणजे पवित्र इंद्रायणीच्या काठावर वसलेली पावन भूमी- आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांची. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आळंदी हे गाव. आळंदी हे गाव पर्यटन स्थळ नाही तर, ते कोट्यवधी वारकऱ्यांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली.   १) संत ज्ञानेश्वर माऊली : एक अलौकिक जीवनप्रवास - आळंदीचा इतिहास समजून घेण्यापूर्वी ज्या मऊलींच्या अस्तित्वाने हि भूमी पवित्र झाली, त्याच्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म आपेगाव येथे मध्ययुगीन काळात झाला होता. त्यांचा वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांना चार भावंडे होते त्यांची नावे पुढीलप्रमाणे-निवृत्तीनाथ,ज्ञानदेव,सोपानदेव,मुक्ताबाई असे हे चार भावंडे होते. या चार भावंडांना तत्कालीन समा...