Tuljapur Trust Mandir In Maharashtra/तुळजापूर प्रवास मार्गदर्शन आणि तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी विशेष माहिती Tuljabhavani Trust Mandir Tuljapur
प्रस्तावना: तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.येथे असलेले मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. तुळजापूर येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे भाविकांची गर्दी दिसून येते. तुळजा भवानी देवीचा इतिहास:- तुळजाभवानी मंदिराचा इतिहास सुमारे १२ शतकापर्यंत मागे जातो. यादव वंशाच्या काळात या मंदिराची स्थापना झाली आहे असे म्हटले जाते. धार्मिक महत्व : तुळजाई देवीला सुष्टीची जननी असे मानले जाते.ती शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले आहे. शिवाजी महाराजांचा सबंध: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी देवीची आराधना केली होती. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांना देवीकडून तलवार प्राप्त झाली होती. तुळजाभवानीचे स्वरूप: १) देवीचे रूप : तुळजाभवानी देवीला अष्टभुजा रूपात दर्शविले जाते. तिच्या हातात शस्त्रे,त्रिशूल, शंक आणि कमळ 🪷 इत्यादी आहेत. २) प्रतिमा: तुळजाभवानी मंदिरातील मूर्ती काळ्या दगडाची आहे. आणि ती अत्यंत आकर्षक व प्रभावी आहे. ३) शक्तिपीठ: तुळजाभवानी हे भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. धार्मिक विधी आणि उत्सव: ...