प्रस्तावना : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील हातलाई देवी मंदिर हे श्रद्धाळूंनसाठी एक महत्वाचे तीर्थस्थान आहे. इतिहास व परंपरा: हातलाई देवीची पूजा शेकडो वर्षापासून केली जात आहे असे स्थानिक लोकांनी सांगितले आहे. स्थानिक लोककथानुसार देवीने गावाचे रक्षण केले आहे. संकटाच्या काळात गावकरण्यांनी देवीला प्रार्थना केली आणि देवीने त्यांचे संकट दूर केले असे म्हटले जाते. त्यामुळे देवीला संकटमोचन म्हणूनही ओळखले जाते. यात्रा व उत्सव: चैत्र व अश्विन महिन्यात यात्रा भरते. यात्रेला लोककला गोंधळ, ढोल-ताशा यांचा उत्साह दिसून येतो. भक्त देवीला नारळ आणि फुले 🌼 अर्पण करतात. यात्रेच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन, कीर्तन यांचे आयोजन केले जाते. हातलाई देवी मंदिर कडे जाण्याचा मार्ग: धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक बस्थानकावरून मंदीरापर्यंत वाहतूक उपलब्ध आहे. जवळचे रेल्वे स्थानक : धाराशिव भक्तांसाठी सोयी सुविधा उपलब्ध: १) मंदिर 🛕 परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध. २ ) विश्रांतीसाठी आणि जेवणासाठी मंडप उपलब्ध आहेत.
Welcome ! dnyaneshwarvlog.blog हा महाराष्ट्रातील धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, मंदिरे आणि सांस्कृतिक सोहळ्यांची माहिती देणारा मराठी ब्लॉग आहे. हा ब्लॉग भक्तीमय वातावरणासोबतच विविध अनुभव आणि प्रवासाचे दर्शन घडवतो. अधिक माहितीसाठी भेट द्या.dnyaneshwarvlog.blog.