Dnyaneshwarvlog.blog

Dnyaneshwar Vlog - प्रवासाची आणि आठवणींची सफर !

रामेश्वर मंदिर कायगांव टोका प्राचीन काळातील

प्रस्तावना: 

रामेश्वर मंदिर हे टोका गावातील असून हे परंपरा आणि अध्यात्म यांचं सुंधर प्रतीक आहे.

कायगांव टोका गावातील हे रामेश्वर मंदिर आहे.

इतिहास: 

रामेश्वर मंदिर हे टोका गावाच्या बेटावर बसलेले देवस्थान आहे. स्थानिक परमपरेनुसार या मंदिराची स्थापना शेकडोवर्षापूर्वी झाली आसून, गावातील वडिलधारे माणसाकडून रामेश्वर मंदिराचा उल्लेख वारंववार आढळतो.

मंदिराच्या स्थापनामागे धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही कारण आहेत.

स्थापना :

स्थानिक परंपपरेनुसार प्रभू रामचंद्र यांनी वनवास काळात कांचन मृगाचा पाठलाग करताना या ठिकाणी येऊन शिवलिंगाची स्थापना केली.

गावकथा: कांचन मृगाचे शीर जिथे पडले ते स्थान टोका म्हणून ओळखले जाते. आणि ते प्रसिद्ध पण तेवढेच आहे.

या दोनी ठिकाणी महादेवाची मंदिरे आहेत.त्यातील एक म्हणजे कायगावतील रामेश्वर मंदिर.

मंदिराचे वैशिष्टे : रामेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर गावाच्या सांस्कृतीकचं प्रतीक मानले जाते.

रामेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील आसून बांधकाम पूर्णपणे दगडाचे आहे.

मंदिराच्या मध्यभागी असलेले ग्रभगृह लहान असल तरी अत्यंत पवित्र मानले जाते.

शिल्पकला : मंदिर 🛕 लहान असूनही त्याची कला 🎭 डोळ्यात डोळ्यात भरणारी आहे.रामेश्वर मंदिर कायगाव टोका येथील शिल्पकला साधेपणातही आकर्षक आहे.

हेमाडपंथी शैली: मंदिराचे काम पूर्णपणे दगडी बांधकाम आहे.दगडी बांधकाम असल्यामुळे ते तेवढेचं मजबूत व टिकाऊ आहे.

स्थंभ व नक्षीकाम: सभामंडपातील स्तंभावर  सूक्ष्म नक्षिकाम केलेले आहे.

लहान आकार असूनही त्यावर केलेले कोरीव काम डोळ्यात भरणारे आहे. प्रत्येक नक्षीकामात धार्मिक भावनांचा स्पर्श जाणवतो. 

प्रवास 🧳 मार्गदर्शन 🚍:

छत्रपती संभाजी नगर ते कायगाव टोका:

नागपूरमार्गे जाताना राष्ट्रीय महामार्ग 🛣️ NH 752 H /NH 52 वापरता येतो.

आंतर: सुमारे ४४.९ किलोमिटर आहे ( थोडे कमी जास्त असू शकते)

watch Video


रामेश्वर मंदिर 🛕 टोका 

Contact Me









टिप्पण्या