Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
<पावसाळ्याचे सौंदर्य >
पावसाळ्याचे सौंदर्य :-
पावसाळ्याचे सौंदर्य :-पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो. पावसाची ओढ हि शेतकऱ्यांना लागलेली असते. पावसाळ्यात निसर्ग रम्य वातावरण आपणास पाहायला मिळते. हिरवीगार झाडे, थंडगार वारा आणि पावसाच्या सरी.
पावसाळ्याचे वैशिष्ट्ये : -
हिरवाई:
हिरवाई आपल्याला पावसाळ्यात पाहण्यास मिळते.कारण जून ऋतू अगोदर असतो. या ऋतूत सगळीकडे कधी ना कधी पाऊस पडत असतो. पावसामुळेच जमिनीवर हिरवळ दिसून येते.
धबधबे:-
पाऊस झाल्यामुळे पाणी नाले, ओढा आणि नद्या भरून वाहत असताना आपल्याला पाहण्यास मिळतात. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार झाडी दिसते . असेच आपणास निसर्ग रम्य वातावरण पाहायला मिळते.
पावसाळ्यातील खेळ:
पावसाळ्यातील खेळ खुपश्या: हा खेळ प्रामुख्याने खेड्या गावातच जातीत जास्त खेळला जातो.
पावसात मुलांना भिजायला आवडते आणि पावसाच्या पाण्यात होड्या सोडायला आवडतात.
खाद्यपदार्थ:
पावसाळ्यात भिजल्यानंतर गरमागरम चहा, गरमागरम भजी, वडे याचा आस्वाद घेत असतात.
खेड्यात आणखी एक पदार्थ घेतात ते म्हणजे कुरवडीचा भुगा आणि शेंगदाणे.
शेती:
शेतकऱ्यांसाठी हा ऋतू जीवनदायी असतो. कारण पाऊस पडला तरच शेतामध्ये अन्न ( गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन इत्यादी पिके पिकतील.) शेतकऱ्यांचे जीवन हे शेतीवरच अवलंबून असते. त्यामुळे हा ऋतू शेतकऱ्यांसाठी जीवनदायी असतो.
पावसाळ्यातील सांस्कृतिक महत्व ( सण) :- पावसाळ्यात अनेक सण असतात. ते कोणकोणते ते पुढीलप्रमाणे:
१) नागपंचमी
२) राखी पौर्णिमा
३) गणेशोत्सव
४) जन्माष्टमी



टिप्पण्या