Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना: श्री संत माऊली महाराज समाधी स्थळ चाकरवाडी इथे आहे. श्री संत माऊली महाराज स्थानिक लोक साक्षात पांडुरंग मानतात. बीड जिल्यातील भक्त-भाविक लोकांची आमोस्याला चाकरवाडी येथे खूप गर्दी आसते. आणी अन्नदान दिवसभर चालू राहते.
भक्त भाविक लोक आधी श्री संत माऊली महाराज यांची समाधीचे दर्शन घेतात. दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त हे रांगेत उभा राहून आपली शिस्त पाळतात.
श्री संत माऊली महाराज समाधीचे दर्शन झाल्यानंतर ते प्रसाद घेण्यासाठी जात असतात.
हे संत विसव्या शतकातील आसून त्यांची समाधी चाकरवाडी येथे आहे.
धार्मिक व सांस्कृतिक महत्व: श्री संत माऊली महाराज हे विसव्या शतकातील महान संत होते.
ते आपले कीर्तन करायचे नेहमी प्रमाणे एकदा असेच किर्तनचा प्रसंग आला पण तेही दोनी ठिकाणी पण एकच दिवशी. ते कसे झाले श्री संत माऊली महाराज हे प्रत्येक गावात कीर्तन करायचे. एका गावकऱ्यांनी त्यांना विचारले दादा ( त्यानं लोक प्रेमाने दादा मानायचे)आमच्या गावात आज कीर्तन करतात का ते मनाले हो. पण अगोदरच दुसऱ्या गावचे कीर्तन दादाकडे होते. पण हो मटल्यानंतर ते दादांच्या लक्षात आले. पण त्यांनी नाही हा शब्द वापरला नाही.
मंग रात्री विचार करत बसले दोन्ही ठिकाणी आपण होकार दिला आहे. कुणाला नाही मटल तर राग येईल. विचार करत रात्र पार पडली. दुसरा दिवस चालू झाला. कीर्तनाची वेळ येत होती. दादा हे एका ठिकाणी कीर्तनसाठी जात होते. ते एकाच गावी गेले होते. कारन एक मानूस एका गावी जाणार. पण दुसऱ्या गावची लोक वाट बगताय हे दादांच्या मनामध्ये विचार चालूच.
पहिल्या गावात पोहचले व कीर्तन चालू झाले. व दुसऱ्या गावात कीर्तन होते त्यामुळे थेथील मंडळी वाट बगत बसली होती. गमत असी झाली तेथे पण श्री संत माऊली महाराज स्वतः आले ते एक देवाचा अवतार होता पण दादानां याची कल्पना नव्हती दोन्हीकडे पण कीर्तन चालू झाले.
इकडे जे बोलताय तेच तिकडेही तेच बोलत होते. आसपास लोकांची चर्चा होत होती इकडे कीर्तन चालू आहे तिकडे पण किर्तन चालू आहे.
साक्षात चमत्कार घडला आणी लोक तेंचे तेथेच पाय पकडले व मनाले दादा तुम्ही फक्त कीर्तनकार नाहीत तर देवच आहेत.
त्यादिवशी पासून लोक त्यांना देव मानू लागले. असा हा विसव्या शतकातील माऊली दादांचा चमत्कार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स




टिप्पण्या