Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना:- भक्ती आणि ज्ञानाचे पावन तीर्थशेत्र महाराष्ट्राच्या मातीला संतांचा आणि थोर वारकरी परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. जेव्हा आपण भक्ती आणि ज्ञानाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती मणजे पवित्र इंद्रायणीच्या काठावर वसलेली पावन भूमी- आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांची. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आळंदी हे गाव. आळंदी हे गाव पर्यटन स्थळ नाही तर, ते कोट्यवधी वारकऱ्यांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली.
१) संत ज्ञानेश्वर माऊली : एक अलौकिक जीवनप्रवास - आळंदीचा इतिहास समजून घेण्यापूर्वी ज्या मऊलींच्या अस्तित्वाने हि भूमी पवित्र झाली, त्याच्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म आपेगाव येथे मध्ययुगीन काळात झाला होता. त्यांचा वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांना चार भावंडे होते त्यांची नावे पुढीलप्रमाणे-निवृत्तीनाथ,ज्ञानदेव,सोपानदेव,मुक्ताबाई असे हे चार भावंडे होते. या चार भावंडांना तत्कालीन समाजाने खुप छळले, कारण तांच्या वडिलांनी संन्यास सोडल्यानंतर पुन्हा ग्रहस्थाश्रम स्वीकारला होता. परंतू या सर्व छळाला आणि विषमतेला बाजूला सारून संत ज्ञानेश्वर माऊलींनी सपूर्ण जगाला प्रेमाची आणी ज्ञानाची शिकवण दिली.
त्यांनी संस्कृत भाषेत आणि सर्वसामान्य जनतेला समजेल असा भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) हा ग्रंथ लिहिला.वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी हा ग्रंथ नेवासा येथे लिहीला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पैस खांब मंदिर श्री शेत्र नेवासा .
पैस खांभ: संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी) हा ग्रंथ नेवासा येथे लिहिला. नेवासा तुलुक्यातील एका खांबाला बुसून त्यांनी हा ग्रंथ लिहीला. त्या खांभाचे नाव पैस खांब नेवासा तुलुक्यातील जेथे संत ज्ञानेश्वरांनी या खंभाखाली बसून हा ग्रंथ लिहिला.
त्यानंतर त्यांनी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टि या ग्रंथाचे लेखन करून मराठी भाषेचे वैभव वाढवले.
२) संजीवन समाधीचा इतिहास आणि पार्श्वभूमी: ज्ञानेश्वरी आणि अमूर्तानुभव या ग्रंथांच्या माध्यमातून आपले अवतारकार्य पूर्ण झाल्यावर, माऊलींनी विचार केला की आता या जगात निरोप घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपले मार्गदर्शक आणि मोठे बंधू संत निवृतीनाथ यांच्याकडे संजीवन समाधी घेण्याची ईच्छा प्रकट केली.
ई. स. १२९६ मध्ये कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला आळंदी येथे ( गुरूवार, २५ ऑक्टोंबर १२९६ रोजी) आळंदी येथे संजीवन समाधी घेतली होती.
३) आळंदी मंदिराची रचना आणि परिसर:- आळंदी येथील मुख्य समाधी मंदिर हे अत्यंत भव्य आणि शांतता प्रदान करणारे आहे. मूळ समाधी स्थळावर काळाच्या ओघात अनेक बदल झाले आहेत आणि आजचे भव्य मंदिर उभे राहिले.
अ.) मुख्य गाभारा आणि दर्शन- मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच संत ज्ञानेश्वर महाराजांची अत्यंत विलोभनीय आणि प्रसन्न मूर्त्ती दिसते. या मूर्तीच्या खालीच मऊलींची मुख्य संजीवन समाधी आहे . समाधीवर चांदीचा मुखवटा आणि सुंदर वस्त्रे परिधान केलेली असतात.गाभाऱ्यात प्रवेश करताच मिळणारी मानसिक शांती ही शब्दातीत आहे. ब.)सुवर्ण कळस आणि सभामंडप-मंदिराला एक भव्य आणि देखणा सभामंडप आहे. या मंडपात सतत कीर्तन, भजन, प्रवचन आणि ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू असते.मंदिराच्या शिखरावर असलेला सुवर्ण कळस दुरूनच भक्तांचे लक्ष वेधतो.
३) आळंदी परिसरातील इतर प्रमुख दर्शनीय स्थळे :- जर तुम्ही आळंदीला भेट देत असाल तर मख्य समाधी मंदीरायव्यतिरिक्त खालील ठीकाणांना नक्की भेट द्या.
अ) माउलींची भिंत: आळंदीमध्ये ती एत्याहासिक भिंत सुरक्षित ठेवण्यात आली आहे. ज्या भिंतीवर बसून माऊली, निर्वत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई यांनी चांगदेवाचे गर्वहरण केले होते.
चांगदेव वाघावर बसून आणि हातात सर्पाचा कोरडा घेऊन माऊलींना
भेटायला आले होते, तेव्हा माऊलींनी निर्जीव भिंतीला चालण्याचा आदेश दिला होता.
ब.) संत जळोबा मंदिर: मंदिराच्या जवळच संत जळोबांचे स्थान आहे, जे माऊलींचे परम भक्त होते.
क.) गोपाळपुरा आणि विठ्ठल मंदिर:- इंद्रयायणिच्या पलीकडच्या तीरावर गोपाळपुरा आहे. जिथे जुने मंदिरे आणि शांत परिसर पाहायला मिळतो.
ड.) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा: जेथून आषाढी वारी दरम्यान पालखीचा पहिला मुक्काम किंवा विसावा होतो .
४) भाविकांसाठी उपयुक्त माहिती आणि प्रवास मार्गदर्शक:-
a.) रस्ते मार्गाने: पुणे स्टेशन, स्वार्गेट आणि शिवाजीनगर बस स्थानकावरून आळंदीसाठी दर १०-१५ मिनिटांनी पीएमपीएमएल ( PMPML) सरकारी बसेस उपलब्ध असतात. तसेच तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा कॅबने नाशिक फाट्यावरून थेट आळंदीला येऊ शकता.
b.) रेल्वेने: सर्वात जवळचे मोठे रेल्वे स्टेशन पुणे जंक्शन आहे.( अंतर सुमारे २२ किमी) येथून तुम्हाला थेट ऑटो किंवा बस मिळतात.
c.) विमानाने: पुणे आंतरराष्टीय विमानतळ ( लोहगाव) हे आळंदीपासून सर्वात जवळचे विमानतळ आहे. जे साधारणता १३ किलोमीटर अंतरावर आहे.
राहण्याची आणि जेवण्याची सोय: आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी आणि पर्यटकांसाठी अनेक धर्मशाळा, भक्त निवास आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत.
आळंदी देवस्थानांचे स्वतःचे भक्त निवास आहे.जिथे अत्यंत कमी दरात राहण्याची सोय होते. जेवणासाठी येथे अनेक खानावळी असून, अनेक ठिकाणी विनामूल्य महाप्रसाद ( अन्नदान) सुरू असते.
टिप्पण्या